118 बडतर्फ एसटी कर्मचाऱयांना कामावर घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केल्यामुळे 118 एसटी कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले होते. या कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश आज सरकारकडून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढाका बैठक आज घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत याविषयीचे आदेश देण्यात आले.

इलेक्ट्रिक, सीएनजी बसेस एसटीच्या ताफ्यात

बसगाडय़ांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर 2022 पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्त्वावर घेतली जाणार असून 500 नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. सुमारे एक हजार बसगाडय़ांचे सीएनजीमध्ये रूपांतरण करण्यात येत असून जून 2023 पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.