बीड जिल्ह्यातून 119 सॅम्पल कोरोना तपासणीसाठी पाठवले

1949

बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 61 वर पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी पुन्हा 119 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या सॅम्पलच्या अहवालांची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. त्यातून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी स्पष्ट होणार आहे.

बीड जिल्ह्यात एक रुग्ण काही रुग्णांच्या संपर्कात आला. त्यामुळे 374 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टर , कर्मचारी आणि काही रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. शुक्रवारी एकूण 119 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तपासणीसाठी पाठवलेल्या सॅम्पलमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील 85, एसआरचीआर आंबाजोगाईतील 02, उप जिल्हा रुग्णालय केजचे 07, ग्रामीण रुग्णालय माजलगावचे 03 तर उपजिल्हा रुग्णालय परळीतील 21 सॅम्पल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या