
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही, या परीक्षेतील एटीकेटी पात्र विद्यार्थ्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश सुरू राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.
आतापर्यंत अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण सहा प्रवेश फैऱ्या पार पडल्या आहेत. याच तीन नियमित आणि तीन विशेष फेऱ्यांचा समावेश आहे. या प्रवेश फेऱ्यांमधून मुंबई विभागातून 2 लाख 43 हजार 790 विद्यार्थ्यानी अकरावीत प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरु आहे. अकरावी प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे याला प्राधान्य असून त्यादृष्टीने पुढील प्रवेश फेऱ्यांचे नियोजन असेल.प्रवेश फेऱ्यांविषयीचे वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर वेळावेळी जाहीर होईल, अशी माहितीही सूर्यवंशी यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा अकरावीचे प्रवेश लवकर सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेशही यंदा आटोक्यात असून 75 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरलेली महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

























































