
वेश्या व्यवसाय करणाऱया बांगलादेशी महिलांनी रेस्क्यू फाउंडेशनमधील केअर टेकर महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय बांधून पळ काढला आहे. ही घटना मोहमंदवाडी ससाणे वस्तीत असलेल्या रेस्क्यू फाउंडेशनमध्ये 23 मार्चला पहाटेच्या सुमारास घडली. तब्बल 20 दिवस हे प्रकरण दडपून ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फाऊंडेशनमधून पळून गेलेल्या दोन महिलांना त्याच दिवशी सय्यदनगर परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले. उर्वरित 10 महिला अजूनही फरार आहेत. विशेषतŠ संबंधित महिला 23 ते 33 वयोगटातील असून पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी वेश्या व्यवसायावर कारवाईतून त्यांची सुटका केली होती. दिघी पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे, देहू रोड पोलीस ठाणे, जेजुरी पोलीस ठाणे आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्यांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्यांना बांगलादेशात परत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दूतावासाशी समन्वय सुरू असतानाच महिलांनी पळ काढला.

























































