राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात 8 हजार 522 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर त्याच्या दुप्पट 15 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.3 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन 2 लाख 5 हजार 415 एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 187 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 77 लाख 62 हजार 005 नमुन्यांपैकी 15 लाख 43 हजार 837 नमुने पॉझिटिव्ह (19.89 टक्के) आले आहेत.

मुंबईत दिवसभरात 1,325 कोरोना रुग्ण
मुंबईत दिवसभरात 1,325 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासात एकूण 2,354 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 98,127 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 38 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 38 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 504 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर आले आहे. तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 71 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 21 हजार 841 इतकी आहे.