बीड शहरात आढळले कोरोनाचे 131 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1945 वर

489

बीड शहरात सलग तीन दिवस अँटीजन तपासणी घेण्यात आली आज शेवटच्या दिवशी झालेल्या तपासणी मध्ये पुन्हा 131 कोरोना बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोना ग्रस्ताचा आकडा आता 1945 वर जाऊन पोहोचला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाची वाढते आकडे पाहता नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. रविवारी मध्यरात्रीपर्यंत आलेल्या अहवालात पुन्हा 96 रूग्णांची वाढ झाली होती. रविवारी दिवसभरात बीड जिल्ह्यामध्ये 233 रूग्ण सापडले. त्यात 137 अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये निष्पन्न झाले तर 96 जणांच्या स्वॅबचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला. एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1814 च्या घरामध्ये पोहचला होता.

सोमवारी दिवसभर बीड शहरातील व्यापार्‍यांचे अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली.   त्यात तब्बल 131 जण कोरोना बाधित सापडले आहेत, कोरोना ग्रस्ताचा आकडा 1945 वर जाऊन पोहोचला आहे, बीड जिल्ह्यात 1186 जण सध्या विविध कोव्हीड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत,तर 714 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्याचे जे स्वब घेण्यात आले त्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या