
डोंगर उतारावर असलेल्या मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा व माजिवडा- मानपाडा या भागांतील 14 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. यासंदर्भात महापालिकेने अॅलर्ट जारी करतानाच डेंजर झोनमधील स्पॉटची यादी जाहीर केली आहे. तसेच प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे माळीण होण्याच्या भीतीने हजारो रहिवाशांवर मृत्युची टांगती तलवार आहे.
महाडच्या तळिये आणि माळीणवर डोंगर कोसळून ही गावे एका क्षणात बेचिराख झाली होती. शेकडो गावकऱ्यांचा बळी गेला होता. भूस्खलनच्या मृत्यूची ही टांगती तलवार ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असताना ठाण्यासारख्या कॉस्मोपॉलिटीण शहरातदेखील दरडींचा धोका वाढत आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या पावसाळ्यात अशा ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती असते. मागील वर्षीदेखील अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली घरे रिकामी करून इतर ठिकाणी वास्तव्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. परंतु कोरोनाचे सावट असल्याने रहिवाशांनी घरे खाली करण्यास नकार दिला आहे.
पावसाळ्यात अशा ठिकाणी भूस्खलन होण्याची भीती असते. मागील वर्षीदेखील अशा स्वरूपाच्या आपली घरे रिकामी करून इतर ठिकाणी वास्तव्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. परंतु कोरोनाचे सावट असल्याने रहिवाशांनी घरे खाली करण्यास नकार दिला आहे.
हे आहेत डेंजर झोन
पालिकेच्या हद्दीतील लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रमजवळ, उपवन, माजिवडामानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा. कळव्यात – आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर तसेच मुंब्यातील आझादनगर, गावदेवी मंदिर परिसर, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगर आदी भागांत दरडी कोसळण्याचा धोका आहे.




























































