अहमदपूरमध्ये 14 हजार नागरिक दाखल; कोरोनाच्या फैलावाची भीती व्यक्त

1853

अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यातील खंडाळी येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खंडाळी गाव सील करण्यात आले असून तालुक्‍यातील पोलीस प्रशासन, तहसील, महसूल, पंचायत समिती. आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी सतर्क झाले आहेत. राणीसावरगाव, काळेगाव रोड, धसवाडी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

सध्या शेतीतील मशागतीची कामे सुरू असून करोनाचा शिरकाव झाल्यामुळे सुरुक्षितेतसाठी गावकरी गावातच थांबत आहेत. शहरात व ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोकही वाढत असल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात 20 मेपर्यंत परवानगी घेऊन आलेल्या लोकांची संख्या 14,207 वर पोहोचली आहे. मात्र, परवानगीविना अवैध मार्गाने येणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या 3406 झाली आहे, अशा माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुनील दासरे यांनी दिली आहे.तर खंडाळी येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण आला असून त्याच्यासोबतच्या 7 जणांना मरशिवणी येथील कोरोना केयर सेंटर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या