संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त शहरात जमावबंदी आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

संभाजीनगरमध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या काळात पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता व फिरता येणार नसल्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढले आहेत. हा आदेश 10 ते 19 सप्टेंबरदरम्यान लागू राहणार आहे. शहरात भाविकांसाठी सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध असून दर्शन केवळ ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करत गणेश मंडप परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने जमू नये, आरती करताना सामाजिक अंतर राखावे, असे आदेश काढले आहेत. शहरात गणेशाच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे विर्सजनाचीही मिरवणूक काढली जाणार नाही, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.