
देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बसला रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात 15 जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत. राजस्थानातील फलोदी येथे ही दुर्घटना घडली. जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्यू झालेले सर्व प्रवासी जोधपूर जिह्यातील सूरसागर येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बिकानेरच्या कोलायत येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परतत असताना ही बस मतोडा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
            
		





































    
    




















