असं झालं तर…15 जीबी डेटा भरला, गुगलने दिला इशारा…

गुगलवरील 15 जीबीचा डेटा भरलाय आणि तुम्हाला गुगलकडून अकाऊंट बंद करण्याची सूचना येत असेल तर त्वरीत पावले उचलावीत. तत्काळ जीमेल स्टोरेज रिकामे करा.

तुमच्या जीमेल अकाऊंटवरून अनावश्यक ईमेल हटवा. फक्त कामाचे ईमेल ठेवा. डिलीट केलेले ईमेल ट्रशमध्ये जातात. ते ट्रश पह्ल्डर व स्पॅम पह्ल्डर मोकळे करा.

जीमेल सुपरफास्ट बनवण्यासाठी तुम्ही लेबल आणि फोल्डर ऑर्गनाईझ करा. बरेचसे युजर अनवॉटेंड ईमेल्सने कंटाळले आहेत. त्यांना अनसबस्क्राईब करा.

तुमच्या जीमेलमध्ये असे अनेक ईमेल असतात, जे तुम्ही कधीही वाचलेले नसतात. ते ईमेल जीमेल स्टोरेज वापरतात. अशा वेळी न वाचलेले ईमेल डिलीट करणेच चांगले.

मोठय़ा फाईल गुगल ड्राइव्हमध्ये ओपन करा. असे करून तुम्हाला स्टोरेज वाचवता येईल. याशिवाय काही शुल्क भरून स्टोरेज विकत घेता येईल.