ठाण्यातील 15 ठिकाणे कोरोना कंटनमेंट झोन जाहीर

1117

ठाणे शहरासह कळवा, मुंब्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून हा आकडा आता 26 वर गेला आहे. त्यामुळे आता ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, असे 15 विभाग पालिकेने कंटेनमेंट झोन म्हणजे बाधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून पालिकेने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे  शहरामध्ये काजूवाडी, दोस्ती विहार, हॅप्पी व्हॅली, मानपाडा, साईबाबानगर कळवा, लोढा पॅराडाइज, माजीवडा, रुणवाल गार्डन, धोबीआळी, कौसा अमृतनगर येथील विघ्नहर्ता इमारत, कळवा मनिषानगर, एमजी रोड नौपाडा, वृंदावन सोसायटी आणि विटावा सूर्यानगर ही 15 ठिकाणे बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या क्षेत्रमध्ये बाहेरील कोणी आतमध्ये जाऊ शकणार नाही तसेच आतील व्यक्तींनाही बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची काळजी घेण्यात येत आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यातही कळव्यात सर्वाधिक म्हणजे 10 रुग्ण आढळले आहेत. तर मुंब्य्रातील अमृत नगर भागात आतार्पयत 4 रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यु झाला आहे. तर शहरातील महापालिकेच्या वागळे आणि दिवा प्रभाग समिती वगळता इतर सात प्रभाग समितीमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

दिव्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी येथील नागरीकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच येथील रहिवाशांसाठी घरपोच किराणा आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रभाग समितीकडून प्रयत्न सुरु आहेत. या भागातील नागरिकांसाठी इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिक विनाकारण बाहेर पडणे टाळत आहेत. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

प्रभाग समिती निहाय कोरोना रुग्ण

विभाग                               रुग्ण

  • माजिवडा मानपाडा               05
  • वर्तकनगर                         01
  • लोकमान्य सावरकरनगर         02
  • नौपाडा                            03
  • उथळसर                          01
  • वागळे                             00
  • कळवा                             10
  • मुंब्रा                                04
  • दिवा                                00
  • एकूण                               26  
आपली प्रतिक्रिया द्या