मुंबईत आचारसंहिता भंगाच्या 16 तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर मुंबईत राजकीय पक्षांचे फलक, झेंडे काढण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 9 हजार 298 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आले आहेत तर खासगी जागेवरील 2 हजार 260 असे एकूण 11 हजार 558 फलक, पोस्टर्स, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. अनधिकृत जाहिराती व फलक लावण्याच्या सोळा तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत.

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी पालिकेचे सहआयुक्त व उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे.

राजकीय पक्ष व उमेदवार हे आचारसंहितेचे काटेकोर पालन करतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याबाबत व आचारसंहितेचा भंग झाल्यास काय कारवाई करावी यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले आले आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली.