ब्रिटनहून आलेले16 जण पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनमध्ये नवा कोरोना आढळून आल्यानंतर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथून हिंदुस्थानात परतणाऱया प्रत्येक प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. 25 नोव्हेंबरपासून हिंदुस्थानात परतलेल्या प्रत्येक प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यापैकी 16 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एक हजार 122 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यात नागपूरमधील 4, मुंबई आणि ठाण्यातील 3, पुण्यातील दोन तर नांदेड, नगर, संभाजीनगर आणि रायगड येथील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे.  पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविण्यात आले असून बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱयांचा शोध घेण्यात येत आहेत.