कोल्हापूरात नवे 16 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 275 वर

642

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.सकाळी 2 तर दुपारी 14 कोरोनाचे आणखी रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 275 झाली आहे. आणखी काही अहवाल प्रलंबित असल्याने रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी रात्री कोरोनाबाधितांची संख्या 259 होती. शनिवारी सकाळी दोन आणि दुपारी 14 रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांची संख्या 275 वर पोहोचली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री आरोग्य प्रशासनाचा पुन्हा एकदा सावळा गोंधळ झाला होता. रुग्ण संख्या मोजण्यात सीपीआर प्रशासनाकडून गफलत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या