दादर रेल्वे स्थानकाबाहेर आग, 16 दुचाकी खाक

दादर रेल्वे स्थानकामधील फलाट क्रमांक 14 जवळील दुचाकीच्या पार्ंकगमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र 16 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. दादर रेल्वे स्थानकाच्या पुर्वेला असलेल्या पार्किंग स्टँडमध्ये बुधवारी सायंकाळी 6.30च्या सुमारास एका दुचाकीला आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने आजुबाजूला उभ्या असलेल्या 16 दुचाकी आगीच्या कचाटय़ात सापडल्या. ऐन गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमक दल  तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. आगीचे नेमके कारण काय याचा शोध माटुंगा पोलीस घेत आहेत.