वर्षभरात मेक्सिकोमध्ये 17 हजार लोकांची हत्या, शवागारे हाऊसफुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेक्सिको

मेक्सिको शहराला अमली पदार्थांचा विळखा बसला असून येथील जलिस्को शहरात वर्षभरात 16 हजार 339 लोकांची हत्या झाली आहे. लोकांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता मृतदेह ठेवण्यासाठी येथील शवागरे अपुरी पडत आहेत. यावर उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने कुलिंग सिस्टीम असलेले मोठ मोठे ट्रक शहराबाहेर उभे केले असून त्यात मृतदेह ठेवण्यात येत आहेत. मात्र याचा मानवी हक्क आयोगाने निषेध केला असून मृतदेहांची काळजी घेण्यास प्रशासन अपयशी असल्याचे म्हटले आहे. अमली पदार्थांमुळे शहरात आतापर्यंच हजारो लोकांचे बळी गेले आहेत. जगभरातील ‘मर्डर रेट’मध्ये मेक्सिको 20 व्या स्थानावर आहे. सप्टेंबरमधील या घटनांमुळे जगभरात मेक्सिकोची निंदा होत आहे.