17 हजार पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावे, 6 जुलैपासून रोजगाराच्या संधी

1804

मिशन बिगिन अगेनमुळे उद्योग व्यवसाय एकीकडे सुरु होत असताना दुसरीकडे एमएमआरडीएच्या कंत्राटदारांच्या माध्यमातून 17 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे सुरु होणार आहेत.

या सतरा हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 2 हजार 923 पदांची भरती होईल.

या वेबसाईटवर रोजगार मेळावा
या पदांच्या भरतीसाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै या कालावधीत तर मुंबई शहर व उपनगर कार्यालयांसाठी 8 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या केळेत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचा हा रोजगार मेळावा होईल.
वेबपोर्टल – https://www.rojgar.mahaswayam.gov.in

या पदांची भरती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील कंत्राटदारांना गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) अशा सतरा हजार कामगारांची आकश्यकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या