वाहनांच्या वायुवेगाला लगाम घालण्यासाठी राज्यात 187 इंटरसेप्टर व्हेईकलची खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात, मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरील बेशिस्त वाहनचालक आणि मद्यपान करून वायुवेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 187 इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी 38 कोटी 33 लाख रुपयांच्या खर्चास आज वित्तिय मान्यता देण्यात आली आहे.

राज्याच्या परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झाला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 76 इंटरसेप्टर वाहनांचे लोकार्पण करण्यात आले होते.

इंटरसेप्टर व्हेईकलचे महत्त्व

परिवहन विभागाच्या वायुवेग पथकासाठी प्रत्येकी 20 लाख 50 हजार रुपये किमतीची 187 इंटरसेप्टर व्हेईकल विकत घेण्यात येतील. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वेगमर्यादा ओलांडून वायुवेगाने वाहने चालवणाऱ्या चालकांना लगाम घालण्यासाठी स्पीड गन, चालकाने मद्यपान केले असल्यास तातडीने चाचणी करण्यासाठी ब्रेथ अॅनालायझर, इंटिग्रेटेड पॅमेरे आणि संपका&साठी आधुनिक दळणवळण यंत्रणा बसवण्यात येईल.