राज्यातील 189 कैद्यांना मिळणार विशेष माफी, कारागृहातून होणार सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यांच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीसह निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेला आहे. त्यानुसार प्रजासत्ताकदिनाला राज्यातील 189 कैद्यांना विशेष माफी देवुन कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित बंदीवानांना मोकळा श्वास घेण्यात येणार आहे.

चांगली वर्तवणूक असलेल्या आणि निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांना मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना संबंधित वैâद्यांना विशेष माफी देउन मुक्त केले जाणार आहे. 15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 याकाळातील बंदीवानांना विशेष माफी देऊन मुक्त केले जाणार आहे. कैद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनावे याकरिता उपक्रमाची अमंलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित कैद्यांचे कारागृहातील वर्तन चांगले असणे आवश्यक आहे. ज्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी कैद्याचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, ज्यांनी शिक्षेचा 50 टक्के कालावधी पूर्ण केला आहे. 70 टक्क्यांपेक्षा अधिक शारिरिक दृष्टया दिव्यांग कैद्यांनी निम्मी शिक्षा भोगलेली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेले बंदी, ज्या कैद्यांचा शिक्षेचा कालावधी संपलेला आहे परंतु ज्यांना न्यायालयाने दिलेल्या दंडाची रक्कम भरता आली नाही, अशा कैद्यांचा विशेष माफी कैद्यात समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील या कैद्यांना होणार फायदा
शिक्षा कालावधीत कैद्यांचे कारागृहातील वर्तन चांगले असणे आवश्यक आहे. त्यामध्ये महिला, पुरुष आणि तृतीयपंथी कैद्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, ज्यांनी शिक्षेचा 50 टक्के कालावधी पूर्ण केला आहे. 70 टक्क्यांपेक्षा अधिक शारिरिक दृष्ट्या दिव्यांग कैद्यांनी निम्मी शिक्षा भोगलेली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बंदीवानांना विशेष माफीचा लाभ मिळाणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमातंर्गत केंद सरकाराच्या आदेशानुसार राज्यातील 189 कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे. त्यानुसार 26 जानेवारीला सकाळी संबंधितांना कारागृहातून सोडण्यात येणार आहे. संबंधित कैद्यांचे वर्तन चांगले आहे. ज्या महिला, पुरुष आणि तृतीयपंथी कैद्याचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, ज्यांनी शिक्षेचा 50 टक्के कालावधी पूर्ण केला आहे. अशांची सुटका केली जाणार आहे.
– अमिताभ गुप्ता, महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा