बीडमधून 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले

428

बीडमधील 43 जणांचा अहवाल शनिवारी मिळाला. त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह तर39 जण निगेटिव्ह आले आहेत. तर एका रूग्णाच्या अहवालाचा निष्कर्ष निघू शकलेला नाही. तर रविवारी बीडच्या जिल्हा रूग्णालयातून पुन्हा 19 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एकूण 20 जणांच्या स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

बीडमधून शनिवारी 43 जणांचा अहवाल मिळाला होता. त्यातील 39 जण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका अहवालाचा निष्कर्ष निघू शकला नव्हता. तर तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक जण बीड शहरातील पालवण चौकात आला होता. बीड शहरातील या रूग्णाच्या संपर्कात तब्बल 28 जण आल्याचे सांगण्यात येत आहे. तो राजुरीजवळ नऊ पोलिसांसह 20 जणांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे. संपर्कात आलेल्या पोलिसांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर 20 जणांचा शोध घेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

17 मे रोजी कर्तव्यावर असणाऱ्या बीड ग्रामीण पोलिसांनी राजुरी येथे टॅम्पो अडवला. त्या टेम्पोमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी बीडचा एक जण पॉझिटिव्ह आला. तो ही प्रवास करत होता. बीडच्या प्रवाशाला तीव्र लक्षणे दिसत असल्याने त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या सर्व प्रक्रियेमध्ये 9 पोलीस त्याच्या संपर्कात आल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या