
विश्रांतीनंतर गेल्या 24 तासात राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडला. रात्रभर पाऊस पडल्याने मुंबई उपनगर रेल्वेसेववर परिणामही झाला होता. ठाण्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे मध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. येथे गेल्या २४ तासांत , १९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील इतर सर्वात पावसाळी ठिकाण येथे पहा.#Maharashtra #maharashtrarains #maharashtraflood #maharashtrafloods #Monsoon2019 https://t.co/HJoqupQO6a
— SkymetWeather (@SkymetWeather) September 3, 2019
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सांताक्रुझमध्ये 131 तर कुलाब्यात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरीत 136, सोलापूरात 35 तर सर्वाधिक कमी नागपुरात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


























































