आसाममध्ये सापडला हिंदुस्थान-चीन युद्धाच्या वेळचा बॉम्ब, सैन्यानी केला नष्ट

आसाममध्ये 62 वर्ष जुना बॉम्ब सापडला आहे. हा बॉम्ब हिंदुस्थान-चीन मध्ये झालेल्या युद्धादरम्यानचा आहे. हा मोर्टार स्मोक प्रकारचा बॉम्ब असून आसामच्या ढेकियाजुली भागात सापडला आहे. सैन्याने हा बॉम्ब नष्ट केला आहे.

शुक्रवारी सेसा नदीत मासे पकडायला गेलेल्या एका व्यक्तीला हा बॉम्ब सापडला. हा चायना मेड बॉम्ब असून 1962 च्या युद्धातल ब़ॉम्ब आहे. हिंदुस्थान आणि चीन दरम्यान 1962 साली युद्ध झाले होते. आसामचे शेजारी राष्ट्र अरुणाचल प्रदेशमध्ये हे युद्ध झालं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब सैन्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर सैन्याने हा बॉम्ब नष्ट केला. मोर्टार स्मोक बॉम्ब हा एक प्रकारता दारु गोळा असतो. 1962 च्या युद्धात गोळीबारांपासून वाचण्यासाठी या बॉम्बेचा वापर करण्यात आला होता.