
राष्ट्रीय हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने
8 आणि 9 एप्रिलला मिरजेत तिसरी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार आहे. मुंबई प्रो शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक डॉ. श्रीकांत परब यांनीच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत संपूर्ण हिंदुस्थानातून 150 हुन अधिक पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंवर सहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस ‘भारत सर्वश्रेष्ठ’ या किताबाने सन्मानित केले जाईल.

























































