नेवासा, जामखेडमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपूर्वी वीज पडून दोनजण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एकदा तालुक्यातील म्हसले येथे अंगावर वीज पडून 10 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाऊस सुरू होण्यापूर्वी शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई ऊर्फ बहिरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय 10) या मुलाच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

जामखेड  तालुक्यातील दिघोळ येथे अचानक वादळ व गारांचा पाऊस सुरू झाला. दिघोळ परिसरातील बाम्हणवाडी रोडवरील शेतात गुरांसाठी घास कापत असलेल्या भीमराव बाजीराव दगडे (वय 65) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. महसूल विभागाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.