
सामना ऑनलाईन । मुंबई
पोलादपूरच्या आंबेनळी घाटात २८ जुलैला बस दरीत कोसळून ३० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची तीक्रता लक्षात घेऊन आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. या आधी राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे ३१ कर्मचारी महाबळेश्वर येथे वर्षा सहलीला जात असताना पोलादपूरमधील आंबेनळी घाटात त्यांची बस ८०० फूट दरीत कोसळली. त्यात बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला तर त्यातील प्रकाश सावंत-देसाई हे एकमेव कर्मचारी सुदैवाने बचावले.






















































