गोदावरी नदीत स्नानासाठी गेलेले दोनजण बुडाले

401
sunk_drawn

गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या बेकायदा वाळू उपशामुळे पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याचा अंदाज येत नाही. श्रावणी सोमवार असल्याने गंगास्नान करण्यासाठी गोदावरी नदीत गेलेल्या दोन तरुणांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते बुडाले. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ते दोघे चूलत भाऊ होते. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला घडली.

श्रावणी सोमवार असल्याने महांकाळ वाडगाव गावातील सचिन वानखेडे (वय 30) आणि भाऊराव वानखेडे (वय 34) हे दोघे चुलत भाऊ गोदावरी नदीपात्रामध्ये आंघोळ करून देवाला पाणी घालण्यासाठी गेले होते. मात्र, नदीपात्रातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. नाशिक परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी आणि प्रवाहाचा जोर वाढला आहे. त्याचा अंदाज आला नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या