ऐन फेब्रुवारीत मुंबई पुन्हा गारठली, तापमान 20 अंशावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिवाळा ऋतू संपला तरी थंडी जाण्याचे चिन्ह दिसत नाहिये. आज मुंबईत कडाक्याची थंडी पडली असून काही ठिकाणी पारा 20 अंशांच्याही खाली आला आहे. वसंत ऋतुच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांनी पुन्हा उबदार कपडे घालून पुन्हा शेकोटी पेटवली आहे.

कुर्ल्यात 19.9 अंश सेल्सियस, विक्रोळीत 19.8 अंश सेल्सियस, बोरीवलीत 18.3 अंश सेल्सियस, कुलाब्यात 20.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दिल्लीतही कडाक्याची थंडी पडली असून तिथे बर्फवृष्टी झाली आहे. तिथूनच थंडीचे वारे आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.