परराज्यातील बनावट दारूसह 20 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बनावट दारुसह त्याची वाहतूक करणारी वाहने असा एकूण 20 लाख 80 हजार 455 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करण्यात आला आहे. तसचे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर भरारी पथकाची परराज्यातील बनावट दारू विक्री विरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. आरोपी दीपक मच्छिद्र निर्मळ (रा.निर्मळ पिंपरी, ता. राहता), दीपक भाऊसाहेब पारधी (रा. जांबूत, ता. संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (रा. कासार दुमाला, ता. संगमनेर), राजेंद्र सीताराम रहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 20,80,445 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे तसेच नगर राज्य उत्पादन अधीक्षक, गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 2 श्रीरामपूर यांच्या पथकाने निर्मळ पिंपरी, (ता. राहता. जि. नगर ) या ठिकाणी छापा टाकून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणातील साठा, दोन आयशर टेम्पो, एक कार तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमध्ये मॅकडोल व्हिस्की, इम्पेरिअल ब्लू, ओसी ब्लू, रॉयल स्टग ब्लेंडर्स प्राईड, मास्टर ब्लेंड तसेच देशी दारू भिंगरी संत्रा व बॉबी आदी नामांकित कंपन्यांची बनावट दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत पथकाने आरोपी दीपक मच्छिद्र निर्मळ ( रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता), दीपक भाऊसाहेब पारधी (रा. जांबूत, ता. संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (रा. कासार दुमाला, ता. संगमनेर), राजेंद्र सीताराम रहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 20,80,445 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना राहता न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई प्रभारी उपाधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, कोपरगाव विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, पी.बी.अहिरराव, दुय्यम निरीक्षक के.यु. छत्रे, एम.डी.कोंडे, ए.सी.खाडे, डी. वाय. गोलेकर, नंदकुमार परते, एन.आर.वाघ, ए.पी. तनपुरे तसेच जवान विकास कंठाळे, सुनील वाघ, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, वर्षा जाधव , राहुल थोरात, टी.आर. शेख, सुनील निमसे आदींनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक प्रकाश अहिरराव हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या