
सामना ऑनलाईन, पुणे
चाकणमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावं जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केल्यानंतरच त्यांची नावे कळू शकतील
चाकणच्या हिंसाचारात बाहेरचे लोक?
खेड तालुका मराठा समाजाने चाकणमध्ये रास्ता रोको आणि बंद पुकारला होता. आंदोलन झाल्यानंतर आंदोलक शांतपणे आपापल्या घरी परतले होते. मात्र परिस्थितीचा फायदा उचलत काही समाजकंटकांनी जाळपोळ आणि तोडफोडीला सुरुवात केली होती असा पोलिसांना संशय आहे. पुरावे मिळू नयेत म्हणून या समाजकंटकांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडून टाकले होते. समाजकंटकांनी सरकारी वाहने, पोलीस ठाणे, चौकी, पत्रकार, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना लक्ष्य करून हल्ला केला होता. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात ४ ते ५ हजार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
































































