
अमरनाथ यात्रा महिनाभरावर येऊन ठेपली असतानाच पाकिस्तानातून जवळपास 200 दहशतवादी सीमा ओलांडून जम्मू-कश्मीरात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी हा दावा केला. या पार्श्वभूमीवर लष्करही प्रचंड सतर्क झाले असून घुसखोरी उधळण्यासाठी राखीव सैनिकही तैनात केले आहेत.
कश्मीर खोऱयात पाकिस्तानने पुन्हा कुरापती सुरू केल्या आहेत. अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधी दहशतवाद्यांकडून आणखी कटकारस्थाने रचली जाण्याची भीती लष्कराने व्यक्त केली आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केली. कश्मीर खोऱयात अलीकडे घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र सध्या जवळपास 200 दहशतवादी पाकिस्तानातून जम्मू-कश्मीरात घुसण्यासाठी तयार आहेत. घुसखोरी उधळून लावण्यासाठी आम्ही सर्व राखीव सैनिकांना तैनात करीत सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. लष्कर दहशतवाद्यांचे कट हाणून पाडेल, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी 2021 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या शस्त्र्ासंधी कराराचे योग्य पद्धतीने पालन केले जात आहे. मागील वर्षभरात शस्त्र्ासंधी उल्लंघनाच्या केवळ दोन ते तीन घटना घडल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
किस्तान सातत्याने दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. सीमेपलीकडे 6 मोठे व 29 छोटे दहशतवादी पॅम्प बनवण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्य व तेथील इतर सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांना हिंदुस्थानात घुसखोरी करण्यासाठी मदत करीत आहेत, असा दावा लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी केला.






























































