200 कैदी महिलांचा गौरव, दीडशे अधिकारी, कर्मचारी महिलांचा सत्कार, भायखळा कारागृहात रंगला हटके महिला दिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनंत समस्यांवर मात करत कारागृहासारख्या ठिकाणी इमाने इतबारे कर्तव्य बजावणाऱया जवळपास दीडशे अधिकारी, कर्मचारी महिलांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला. शिवाय कारागृहाबाहेर विविध पदार्थ बनवून स्वतःचा छोटेखानी व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण घेणाया पैदी महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अशाप्रकारे आगळावेगळा महिला दिन भायखळा कारागृहात साजरा करण्यात आला.

कळत नकळत गुन्हा केल्यामुळे ब्रयाचदा महिलांना देखील कारागृहात जावे लागते. पण त्या चार पोलादी भिंतीच्या आत गेल्या म्हणजे त्या महिलांना समाजाने नाकारले असे होत नाही. हि सकारात्मक भावना पैदी महिलांमध्ये सातत्याने निर्माण करण्याचे काम भायखळा कारागृहातील महिला अधिकारी व कर्मचारी करत असतात. परंतू त्यांचे हे कार्य कधी समोर येत नाही. म्हणूनच कारागृह अधीक्षक विकास रजनालवार यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज सर्व महिला अधिकारी व कर्मचायांचा यथोचित सत्कार करत त्यांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले. जन्मदाती आई तसेच जिजाऊ, सावित्रीमाई फुले, माता रमाई, आहिल्याबाई होळकर या आदर्श मातांचे योगदान व त्यांचा आदर्श याबाबत रजनालवार यांनी माहिती दिली. शिवाय त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कारागृहात पैदी महिलांसाठी पाककलेचे प्रशिक्षण देण्यात आले. चार तुकडयांमध्ये जवळपास 190 पैदी महिलांनी हे प्रशिक्षण घेतले. आता कारागृहाबाहेर गेल्यानंतर त्या फास्टफुड बनवून स्वतःचा व्यवसाय करण्यास सज्ज झाल्या आहेत. त्या महिलांचा देखील प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. अधीक्षकांनी अशाप्रकारे महिलांचा सत्कार केल्याने आज कारागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनी एकत्र बसून अल्पोपहराचा आनंद लुटला.