
2020 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे 23 हजार 722 तक्रारी मिळाल्या आहेत. गेल्या सहा वर्षात या सर्वाधिक तक्रारी आहेत. या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशमधल्या असून त्यानंतर दिल्ली आणि हरयाणातून आल्या आहेत.
आयोगाल्या आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी या मानसिक छळ केल्याच्या तक्रारी आहेत. त्यानंतर घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी आहेत. आयोगाकडे 5 हजार 294 घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी आल्या आहेत.
सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशमधून आल्या असून त्यांची संख्या 11 हजार 872 इतकी आहे, त्यानंतर दिल्लीतून 2 हजार 635. हरयाणातून 1 हजार 266, तर महाराष्ट्रातून 1 हजार 188 तक्रारी मिळाल्या आहेत.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये गेल्या सहा वर्षांपेक्षा अधिक तक्रारी मिळाल्या आहेत. 2014 साली आयोगाकडे 33 हजार 906 तक्रारी आल्या होत्या. कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यावेळी घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण वाढत जुलैपर्यंत आयोगाला तब्बल 660 तक्रारी आल्या होत्या.





























































