
हिंदुस्थानातील प्रमुख महिला टेनिस स्पर्धा ‘एल अँड टी मुंबई ओपन WTA 125K सिरीज’ ही स्पर्धा पाचव्या हंगामासाठीद सज्ज आहे. ही स्पर्धा मुंबईतील महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (MSLTA) येथे आयोजित केली जाणार असून, पात्रता फेऱ्या 30 जानेवारीपासून सुरू होतील, तर मुख्य फेरी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान खेळवली जाईल.
लुलू सन (न्यूझीलंड), दार्जा सेमेनिस्ताया (लाटव्हिया) आणि किम्बर्ली बिरेल (ऑस्ट्रेलिया) यांसारख्या जगभरातील नामवंत खेळाडू मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत. तर हिंदुस्थआनी टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा यासाठी वाइल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत प्रवेश दिला जाईल. मागील वर्षी माया राजेश्वरन आणि साहजा यमलापल्ली यांसारख्या खेळाडूंनी येथे चमकदार कामगिरी केली होती. ही स्पर्धा हिंदुस्थानी संघाच्या ‘बिली जीन किंग कप’ तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.























































