लातूरकरांना दिलासा, 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह

लातूर  येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक रविवारी  एकुण 21 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. सर्वजणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेक दिवसानंतर प्रथमच लातूरकरांना दिलासा मिळाला.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथुन एकुण 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 6 व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या