14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपणार का? केंद्र आणि राज्य सरकार काय विचार करताहेत? वाचा सविस्तर वृत्त

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता 21 दिवसांचा लॉक डाऊन हा 14 एप्रिल रोजी संपणार की त्यामध्ये आणखी काही दिवसांची भर पडणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला कोरोनाचे संकट दुसर्‍या बाजूला आर्थिक संकट अशा कैचीत सध्या नागरिक अडकले आहेत. लॉकडाऊन वाढणार की नाही ही याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र केंद्र आणि राज्यांची सरकारे एकत्रित यावर एक्शन प्लान ठरवत आहेत. 14 तारखेला लॉक डाऊन संपुष्टात आणण्याचा निर्णय जरी घेण्यात आला तरी तो सर्वत्र असेलच असे नाही. तसेच अटी आणि नियमांवर आधारित ही सूट देण्यात येईल अशी माहिती ती एका हिंदी वृत्त संकेतस्थळाने सूत्रांच्या आधारे दिली आहे.

covid-19 सोबत लढण्यासाठी केंद्राने एक समिती ती गठीत केली आहे. या समितीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दिले आहे. तसेच या समितीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी आहेत. covid-19 सोबत लढताना कोणत्या उपाययोजना कराव्यात, तसेच अशा प्रकारच्या उपाययोजना करताना कोणत्या अडचणी येतात त्यानुसार चर्चा करून एक्शन प्लान ठरवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पंजाब यासारख्या मोठ्या राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्यास समर्थन दर्शविले आहे. मात्र यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

सध्या विविध उपाययोजना संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये हे चर्चा सुरू आहेत. यानुसार दिल्ली सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी जसे ऑड-इवन चा फॉर्मुला वाहतुकीसाठी लागू केला होता त्याच धर्तीवर संपूर्ण देशात गर्दी टाळण्यासाठी ऑड-इव्हनचा फॉर्मुला लागू करण्याचा विचार सुरू आहे. तसेच वाहनांमध्ये किती प्रवासी संख्या असावी यावर देखील विचार सुरू आहे.

केंद्रीय समितीत शाळा तसेच महाविद्यालय 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले जेणेकरून गर्दी टाळता येईल.

तसेच गर्दी टाळण्यासाठी म्हणून धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. ही बंदी पुढील काही काळ कायम ठेवण्यात येईल असा विचार सुरू असल्याचे कळते.

यासोबतच लॉकडाऊन दरम्यान वाहतुकीसाठी राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या सीमा पुढील काही काळासाठी अशाच प्रकारे बंद ठेवण्यात येतील. जोपर्यंत स्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सीमा खुल्या करण्यात येणार नाहीत, अशी शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे. यासोबतच रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक सेवा देखील सर्वांसाठी तात्काळ खुल्या करण्यात येतील असे चित्र सध्यातरी दिसत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय विविध याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथील लॉकडाऊन लवकर उठवण्यात येईल येईल, अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही. तसेच त्यांच्यासाठी वेगळे नियम करण्यात येतील अशी शक्यता नाही ही नाकारता येत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या