बिहारमध्ये वीज कोसळून 21 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू

543

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 जिल्ह्यांत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारच्या लाखीसराई, गया, बंका, जमुई, समस्तीपूर, वैशाली, नालंदा आणि भोजपूर जिल्ह्यात वीज कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी सात जणांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला होता. बिहारमध्ये आतापर्यंत 90 जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या