
केंद्र सरकारने नुकतंच पबजी हा मोबाईल गेम बॅन केला आहे. त्यामुळे 21 वर्षीय विद्यार्थ्याने कंटाळून आत्महत्या केली आहे. पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातील घटना आहे.
केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव पबजी गेमसह 118 ऍप बॅन केले होते. बंगालचा हा विद्यार्थी पबजीच्या आहारी गेला होता. गेम बॅन केल्यानंतर तो खुपच दुःखी होता. शुक्रवारी त्याने सकाळी उठून न्याहारी केली आणि आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतून लॉक केला. नंतर त्याच्या आईने दुपारी जेवण्यासाठी त्याला हाक मारली पण तो काही प्रतिसाद देत नव्हता. अखेर आईने शेजारापाजार्यांना बोलवून दरवाजा तोडला तेव्हा विद्यार्थ्याने गळफास घेतला होता .




























































