
मुंबई कोरोना नियंत्रणात असला तरी दरदिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम आहे. मुंबईत आज दिवसभरात 22 रुग्ण सापडले तर 24 जण कोरोनामुक्त झाले. सापडलेल्या 22 रुग्णांपैकी 18 जण कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. यातील 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर एकाला ऑक्सिजन बेड देण्यात आला. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 140 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 892 चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, राज्यात 64 रुग्ण सापडले, तर 87 जण कोरोना मुक्त झालेत. राज्यात एकही मृत्य झालेला नाही.




























































