वैष्णो देवी मंदिरात कोरोनाचा प्रादुर्भाव, तीन पुजार्‍यांसह 22 जणांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैष्णो देवी मंदिराच्या तीन पुजार्‍यांसह 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात चार पोलीस, चार जवान आणि श्राईन बोर्डाच्या कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

तब्बल पाच महिन्यानंतर रविवारी वैष्णो देवीच्या यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर मंदिरातही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वैष्णो देवी मंदिर परिसरात 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

तिरुपती मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण, तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू 

यापूर्वी रविवारी 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाले होते. सोमवारी पुन्हा 22 जणांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले. त्यात मंदिरातील तीन पुजारी, चार पोलीस, चार जवान, वैष्णो देवीच्या कर्माचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाधल्याने कोविड सुविधा सुरू करण्यात आली. सर्व कोरोना रुग्णांना एका ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोमवारी 200 भाविकांनी वैष्णो देवीचे दर्शन घेतले आहे.

यापूर्वी तिरुपती मंदिरातील 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी आतापर्यंत 403 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तिरुपती प्रशासनाने सांगितले की मंदिर सुरू करताना कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. सर्व भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करण्यात आले होते. ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या त्याची सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात आली होती. फक्त मंदिर प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालेली नाही. संपूर्ण राज्य आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे प्रशासनाने म्हटले. जुलैमध्ये देशभरातून 2 लाख 38 हजार भाविकांनी तिरुपती मंदिराचे दर्शन घेतल्याचेही प्रशासनाने नमूद केले.