
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. मात्र, महामंडळाने बडतर्फ केलेले सुमारे 22 कर्मचारी सातारा विभागात हजर झाले आहेत.
एसटी कर्मचारी विलीनीकरण मुद्दय़ावर ठाम आहेत. महामंडळ व कर्मचाऱयांमध्ये तोडगा निघत नसल्याने संप लांबणीवर पडला आहे. मात्र, काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने त्यांच्यामार्फत लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात एसटीच्या फेऱया सोडण्यात येत आहेत. महामंडळामार्फत सातारा विभागातील 11 आगारांमधील कर्मचाऱयांवर नव्याने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, बडतर्फ करण्यात आलेले 22 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत
दरम्यान, सातारा विभागातील सातारा आगारातील 88 बसेसच्या 199 फेऱयांतून 7 हजार 611, कराड आगारातील 38 बसेसच्या 124 फेऱयांतून 5 हजार 860, कोरेगाव आगारातील 8 बसेसच्या 13 फेऱयांतून 678, फलटण आगारातील 18 बसेसच्या 29 फेऱयांतून 1 हजार 46, वाई आगारातील 13 बसेसच्या 69 फेऱयांतून 2 हजार 869, पाटण आगारातील 29 बसेसच्या 107 फेऱयांतून 5 हजार 554, दहीवडी आगारातील 14 बसेसच्या 40 फेऱयांतून 1 हजार 725, महाबळेश्वर आगारातील 12 बसेसच्या 28 फेऱयांतून 1 हजार 321, मेढा आगारातील 9 बसेसच्या 48 फेऱयांतून 3 हजार 76, पारगाव-खंडाळा आगारातील 6 बसेसच्या 26 फेऱयांतून 746, वडूज आगारातील 23 बसेसच्या 73 फेऱयांतून 5 हजार 78 अशा मिळून 258 बसेसच्या 756 फेऱयांमधून 35 हजार 564 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.




























































