
पुण्यामधील कात्रज भागातील रामभाऊ म्हाळगी शाळेमध्ये माध्यान्ह शालेय पोषण आहारामुळे 22 विद्यार्थ्यांसह महिला प्राचार्यांना विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेत बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना माध्यान्य शालेय पोषण आहारांतर्गत मसाले भात देण्यात आला होता. विद्यार्थ्यांसह महिला प्राचार्यांनीही मसाला भात खाल्ला होता. आहार खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना त्वरीत जवळील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या शाळेला सेंट्रल किचनद्वारे भोजन पुरविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस याचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.
Maharashtra: 22 students & a teacher of Rambhau Mhalgi School in Pune admitted to Bharti Hospital today, when they complained of vomiting and loose-motion after consuming mid-day meal at school.
— ANI (@ANI) August 21, 2019


























































