अवघ्या दोन रुपयांसाठी तरुणाचा केला खून

1306

दोन रुपयांच्या वादावरून आंध्र प्रदेशात एका 24 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात सुवर्णराजू हा तरुण कामगार एका सायकल गॅरेजपाशी आपली सायकल घेऊन गेला. सुवर्णराजूने सायकलच्या टायरमध्ये हवा भरून घेतली. गॅरेज मालक सांबाने त्याच्याकडून दोन रुपये मागितले. सुवर्णराजुकडे द्यायला पैसे नव्हते. या दोन रुपयांवरून दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. सांबाचा मित्र अप्पाराव तिथेच उपस्थित होता. त्याने सुवर्णराजूच्या डोक्यात लोखंडाची सळी घातली.

यात सुवर्णराजू चांगलाच जखमी झाला. लोकांनी त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांबा आणि अप्पाराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यात सांबाला पोलिसांनी अटक केली असून अप्पाराव फरार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या