
सफाई कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी अनेक प्रयत्न होत असताना गेल्या तीन वर्षात 271 सफाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारात ही आकडेवारी समोर आली आहे.
सामाजिक न्याय आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सफाई कर्मचार्यांकडे आधुनिक यंत्रणा नाहीत. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2019 साली जमिनीखालील गटारात सफाई करताना 110 कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2018 साली 68 तर 2017 साली 193 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन वर्षात कामादरम्यान सर्वाधिक सफाई कर्मचार्यांचा मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 50 सफाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे.
तमिळनाडू, हरयाणात आणि दिल्लीत प्रत्येकी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सफाईमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत नाही त्यामुळे मृत्यू होतात अशी माहिती आयोगाने दिली आहे. आयोगाने वारंवार सांगून दिल्ली आणि हरयाणामध्ये आता यंत्रांचा वापर होत आहे परंतु सर्व राज्यांची यंत्रांचा वापर करणे गरजेचे आहे असे आयोगाने सांगितले.
असे असले तरी हे खरे आकडे नाही असा अरोप सफाई कर्मचार्यांसाठी काम करणार्या संगठनांनी केली आहे. सफाई करताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांची संख्या अधिक आहे असा दावाही त्यांनी केला आहे. अनेक दूरवरच्या ठिकाणी झालेल्या मृत्यूंची नोंद अहवालात केली जात नाही.
सफाई कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबींयांना 10 लाख रुपयांची मदत द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे सफाई कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयानंतरही अनेक पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे विल्सन यांनी सांगितले आहे.
























































