
सिक्कीममध्ये आज राज्याच्या उत्तरेकटील चाटेन येथे भूस्खलन झाल्यामुळे अडकलेल्या मुलांसह 28 जणांना राज्य सरकारने हॅलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढले. राज्यात मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी भूस्खलन झाले असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रशासनाने हॅलिकॉप्टर भाड्याने घेऊन तत्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केल्याचे वृत्त आहे. बचावकार्य करताना 6 जवान बेपत्ता झाले असून त्यांची अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही.