
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. त्यामुळे येत्या 2 जूनपासून श्री विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. संवर्धनाच्या कामामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन अडीच महिने बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता मंदिराचा गाभारा, सोळखांबी आदी भागातील काम पूर्ण झाले आहे.



























































