नगर जिल्ह्यात 3 रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 73 वर

540

नगर जिल्ह्यातील आणखी 3 रूग्ण सोमवारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले. या 3 रुग्णांना सोमवारी बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली 73 झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 32 वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील 24 वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील 56 वर्षीय व्यक्ती कोरोनातून बरे झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी त्यांना निरोप देऊन चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असून नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या