चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत 3 बछडे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

अवनी वाघिणीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच चंद्रपूरमध्ये बल्लारपूर एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत वाघाच्या तीन बछडय़ांचा मृत्यू झाला आहे.  जुनोना जंगलातील रेल्वे रुळावर ही दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. हे छावे सुमारे 7 ते 8 महिन्यांचे आहेत.

 चंद्रपूर जिह्यातील जुनोना जंगल वाघांसाठी प्रसिद्ध आहे. सकाळी दोन मृतदेह आढळले होते. तिसरा मृतदेह सायंकाळी आढळला. रेल्वे मार्गावर 2 बछडे मृत पावल्याची घटना सुरुवातील समोर येताच परिसरात खळबळ उडाली. बछडय़ांचे वय 7 ते 8 महिने असल्याचा अंदाज आहे.

जुनोना जंगलातून बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग जातो. सकाळी निघणाऱ्या बल्लारपूर-गोंदिया रेल्वेने हा अपघात झाला. सकाळी हे बछडे रेल्वे मार्गावर खेळत असावेत तेव्हा अचानक आलेल्या रेल्वेमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळ हे वन विकास महामंडळच्या अंतर्गत येते.