VIDEO: नंदुरबार जिल्ह्यात आभाळ फाटले, तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि विसरवाडी परिसरात झालेल्या ढगफुटीने तिघांचे मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये बालाहाट येथील जामनाबाई गावित, खोकसा येथील वंतीबाई गावित, चिंचपाडा येथे एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. तर नवापुर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जन बेपत्ता असून प्रशासन आणि नागरीक त्यांचा शोध घेत आहेत.

गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने थैमान घातले आहे. अवघ्या चार तासात 140 मीलीमीटर पाऊस पडल्याने नदी-नाले धोक्याच्या पातळीवर वाहत होते. अचानक झालेल्या पावसामुळे अनेकजण पुरात अडकून पडले होते. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे येथील रंगावली, सरपण या नद्यांना भयंकर पूर आल्याने नदी काठावरची घरं पाण्याखाली गेली. पुरामुळे जवळपास चारशे पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अनेकांची गुरं- ढोरं वाहुन गेल्याने नागरीक हवालदील झाले आहेत.

उची शेवडी येथील धरण फुटल्याने ६ पूल वाहून गेले आहेत, तसेच वीज पुरवठा देखील खंडीत झाल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे नवापुर तालुक्यातील हजारो हेक्कटर शेतीवरील पीकांचा नुकसान झाले आहे.

दरम्यान, प्रशासनाने मध्यरात्रीपासुनच मदत कार्यसुरू केल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी पुरग्रस्ताना मदत करत त्याना सुरक्षीत स्थळी हलवले आहे.