
नगर जिह्यात लम्पी या जनावरांना होणाऱया संसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढतच असून, आणखी 315 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. यामुळे लम्पी बाधितांचा आकडा आता 4 हजार 183 झाला असून, यातील 2 हजार 269 जनावरांनी लम्पीवर मात केली आहे, तर मृत जनावरांचा आकडा आता 196 झाला आहे.
नगर जिह्यात महिनाभरापासून लम्पीचा संसर्ग वाढत आहे. लम्पीला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपाययोजनांसह वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. असे असताना लम्पीला रोखण्यात पशुसंवर्धन विभाग कमी पडत असल्याचे चित्र आहे. जिह्यात 204 गावांमध्ये लम्पीबाधित जनावरे असून, या गावाच्या पाच किलोमीटरच्या परिघातील 1 हजार 62 गावांतील जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाने हाती घेतलेले आहे. जिह्यात 11 लाख 59 हजार 822 गायवर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात येत असून, यापैकी 8 लाख 80 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.
सुरुवातीला केवळ उत्तरेतील काही तालुक्यांत असलेला लम्पी हळूहळू संपूर्ण जिह्यात पसरला. आतापर्यंत 196 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झालेला आहे. शासनाने लम्पीने मृत्यू झाल्यास शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ते 30 हजार रुपये प्रतिजनावर ही मदत मिळणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमून हे प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत. परंतु, नगर जिह्यात अद्यापि कोणालाही मदत मिळालेली नाही. केवळ 12 जनावरांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, त्यापोटी 3 लाख 12 हजार रुपयांची मदत शेतकऱयांना मिळणार आहे.
सोलापुरात चार जनावरे दगावली
सोलापूर ः जिह्यात लम्पी आजाराने आज चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. करमाळा शहरात 1 खिल्लार गाय, दिवेगव्हाण आणि राजुरी येथील गाईचे प्रत्येकी एक वासरू, तर माळशिरस तालुक्यातील बांगरडे येथील एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला. जिह्यात लम्पी आजाराने आतापर्यंत 21 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 गायी, तीन गायींची वासरे आणि सात बैलांचा समावेश आहे.























































